‘गजनी’ गर्ल असीन सध्या सॉलिड भूमिकेच्या शोधात आहे. आतापर्यंत केलेल्या कामावर ती समाधानी नाही. येत्या काळात तिला अॅक्टिंग क्षेत्रात करियर घडवत असताना खूप काही करायचे आहे. गजनी चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केलेल्या असिनचे आतापर्यंत ‘रेडी’, ‘हाउसफुल-२’ व ‘बोल बच्चन’ हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याने सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे असीन सध्या फॉर्ममध्ये आहे.
या यशाबद्दल असीन म्हणाली, ‘ बॉलीवूडमध्ये कुठ्लाही गॉडफादर वा श्रीमंत बॉयफ्रेंड नसताना मी इथपर्यंत येऊन पोहचले आहे. मी नॉर्थ आणि साउथच्या प्रेक्षकाना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न माझ्या अभिनयातून केला आहे. या पुढील कामे करताना माझ्या फॅन्सना आवडतील अशा वेगळ्या धाटणीच्या सॉलिड भूमिकेचा मी सध्या शोध घेत आहे.’
बॉलीवूडमध्ये असिनने ‘गजनी’ चित्रपटात अमिर खानच्या ऑपोझिट रोल केला होता. त्यानंतर ‘बोल बच्चन’ मध्ये कॉमेडी भुमिका करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘रेडी’ आणि ‘हाउसफुल-२’ मध्ये कॉमेडी करून सर्वांचा टाइमपास तिने केला होता.
असीनच्या मते कॉमेडी चित्रपटातील हिरोला फोकस करून चित्रपटाची निर्मिती केली जाते आहे . त्यामुळे चांगला परफॉर्मन्स करूनही हिरोईनला त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. हिरोईनला सेंटर ठेऊन तयार करण्यात आलेल्या सिनेमात काम करण्याची तिची इच्छा आहे.