विलासराव उपचारासाठी चेन्नईकडे रवाना

मुंबई: केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना काही तपासण्यांनंतर उपचारासाठी चेन्नई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशमुख यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारार्थ चेन्नई येथील सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Comment