बॉलीवूडची ‘चिकनी चमेली’ कतरीना कैफ सध्या तीन स्टार खान सोबत काम करीत असल्याने चर्चेत आहे. तीन स्टार खान सोबत एकाच वेळी काम करण्याचा अनुभव कसा आहे याबाबत काहीनी कतरीनाची प्रतिक्रिया जाणून घेतली.

बॉलीवूडची ‘चिकनी चमेली’ कतरीना कैफ सध्या तीन स्टार खान सोबत काम करीत असल्याने चर्चेत आहे. तीन स्टार खान सोबत एकाच वेळी काम करण्याचा अनुभव कसा आहे याबाबत काहीनी कतरीनाची प्रतिक्रिया जाणून घेतली.
कतरीना म्हणाली की, ही संधी मिळाली याबद्दल फिल्म मेकर्सचे आभार मानायला हवेत. मी या तिघासोबत काम करीत असलेल्या चित्रपटात केवळ शो पीस नसून माझा सुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण रोल आहे. मी यासाठी खूप स्ट्रगल केले असल्याने बीझी शेडयुलमध्ये सुद्धा या ऑफर चालून आल्या आहेत. तसेच सिनेमामधील टिपीकल गर्ल अशी क्रेझ मी जपली असल्याने खऱ्या अर्थाने बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात मी अक्टिंग आणि लोकप्रियतेच्या बाबतीत तीनही खानांची बरोबरी करू शकत नाही.
येत्या काळात तिचा सलमान सोबत ‘एक था टायगर’ तर अमीर खान सोबतचा ‘धूम-३’ हा चित्रपट येत आहे. त्याशिवाय शाहरुख खान सोबत यावर्षीच्या शेवटी तिचा एक सिनेमा येत आहे.