आराध्याला जन्म दिल्यानंतर ऐश्वर्या राय इंडस्ट्रीजमध्ये परतणार की नाही यावरून वेगवेगळ्या कमेंट्स ऐकण्यास येत असतानाच ती पुन्हा लाइमलाइटमध्ये आली आहे. ऐशने नुकताच एका ज्वेलरी ब्रांडच्या अॅडसाठी फोटो शूट केले आहे. बाळंतपणात वाढलेले वजन कमी केल्यानंतर एका अॅडसाठी ती पहिल्यांदाच ग्लॅमरस लूकमध्ये झळकली.
बऱ्याच दिवसाच्या रेस्टनंतर तिने काम पुन्हा सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐशने वजन कमी केल्याने पूर्वीच्या तुलनेत ती या ज्वेलरी ब्रांडच्या अॅडवेळी किती तरी पटीने सुंदर दिसत होती.
ऐश सोबत अॅड करणारा श्रीकुमार म्हणाला की, पहिल्यांदाच ऐशसोबत शूट केले आहे. तिची बॉडी लँग्वेज व स्टेप्स पाहून मी खूपच इम्प्रेस झालो. तिच्या सोबत पाण्यात काही इंटरेस्टिंग सीन शूट केले. माझ्यासाठी ही अॅड म्हणजे एक आठवणीचा खजिना ठरणार आहे. काही दिवसापूर्वीच ऐश हॉलीवूडच्या सिनेमामधून परतणार असल्याचे समजले होते. मात्र त्यापूर्वीच तिने एका अॅडच्या माध्यमातून एन्ट्री केली आहे.