शाहरुख झळकणार क्रिश -३ मधून

शाहरुख आणि ह्रितिक याच्यातील मैत्रीची चर्चा बॉलीवूडमध्ये फारशी होत नसली तरी ते दोघे चांगले मित्र आहेत हे नक्की. अन्यथा शाहरुख ऋतिक रोशनच्या क्रिश ३ मध्ये काम करण्यास तयार झाला असता का ? ह्रीतीकने शाहरुख खानच्या डॉन-२ या चित्रपटात काम केले होते. ते स्मरून क्रिश ३ मध्ये शाहरुख काम करणार आहे. या चित्रपटात त्याची काय भूमिका आहे हे अजून ठरलेले नसले तरी या चित्रपटातील रोलच्या बाबतीत या दोघांची मीटिंग झाली असल्याचे समजते.

एसआरके आणि ऋतिक या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर एकत्रित काम करताना दिसतील. यापूर्वी दोघानी कोयला या चित्रपटात एकत्रित काम केले होते. पण या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून ऋतिकने काम पहिले होते.

ऋतिक आणि शाहरूख या दोघातील संबधच मैत्रीपूर्ण आहेत असे नाही तर शाहरुखची पत्नी गौरी आणि सुजेन मध्ये चांगली मैत्री आहे. या दोघी कामानिमित सतत एकमेकाना भेटत असतात त्यामुळे त्यांचे कौटुंबिक संबध चांगले आहेत. क्रिश ३ मध्ये शाहरूख कोणती भूमिका करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Leave a Comment