शाहीद कपूरला मिळाले काम

फटा पोस्टर निकाला हिरो या वाक्यावरुन काही बोध होतोय? नाही ? अहो हा आपल्या राजकुमार संतोषीचा नवा मसाला चित्रपट आहे. शाहीद कपूर त्यात प्रमुख भूमिका करणार असून बराच काळ रिकाम्या बसलेल्या शाहिदला त्यामुळे काम मिळाले आहे.

संतोषीनी बऱ्याच काळानंतर हा मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. आजपर्यंतच्या अनुभवावरून हा एक चांगला चित्रपट असेल असे प्रेक्षकांना वाटते. या चित्रपटातील शाहिदची भूमिका युवकांना अपील करणारी असून शाहीद सुपरस्टार होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणाची भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे मात्र त्याच्या आईची तो सुपरस्टार होऊ नये अशी इच्छा असल्याने ती सतत विरोध करीत असते अशी या चित्रपटाची थीम आहे.

या चित्रपटामुळे शाहीदच्या थांबलेल्या गाडीला थोडासा धक्का बसणार असल्याने त्याची थांबलेली कारकीर्द पुढे सरकेल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. शाहीदसुद्धा गेल्या काही दिवसापासून चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत होता. राजकुमार संतोषीची ही स्क्रिप्ट पाहिल्यानंतर त्याने लगेचच होकार दर्शविला आहे. या चित्रपटासाठी सध्या नायिकेचा शोध घेण्यात येत असून त्यासाठी सोनाक्षी सिन्हा हिच्याशी सपंर्क साधण्यात आला आहे. तिने जर होकार दर्शविला तर यावर्षीच्या एन्डला शुटींग चालू होईल.