सैफची फेकाफेकी

कोण कुठ्ल्या कारणाने कधी अडचणीत येईल याचा काही नेम नाही. ये दिल्लगी चित्रपटात सैफ अली खानने अवखळ व नटखट तरुणाची भूमिका करून सर्वाचीच करमणूक केली होती, तशीच करमणूक तो सध्या त्याच्या लग्नाची ठिकाणे बदलून करत आहे. त्याने हॉलीवूड अभिनेत्री नतलीसोबत चित्रपट साइन केल्याचे खोटेच सांगून फेकाफेकी केली आणि या करमणूकीत भर टाकली आहे.

सैफने करीनासोबत १०० जणांच्या उपस्थितीत मालदीवमध्ये विवाह करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता ब्राझीलमधील रिओ दे जेनिरो या ठिकाणी लग्नसमारंभ करण्याचे ठरविले असल्याचे सैफ सांगत आहे. सैफने आगामी काळात हॉलीवूडमधील अभिनेत्री नताली सोबत चित्रपट साइन केल्याचे सांगितले होते. त्याप्रकरणी अभिनेत्री नतालीने सैफला कायदेशीर नोटीस पाठविली असल्याचे समजते. या नोटीसीबाबत सैफला विचारले असता त्याने आतापर्यंत कुठलीच नोटीस मिळाली नसल्याचे सांगून केवळ करमणूक करण्याच्या दृष्टीने हे वक्तव्य केले असल्याचे स्पष्ट केले.

सैफच्या या फेकाफेकीमुळे मात्र आता सगळेच हैराण झाले आहेत.

Leave a Comment