प्रियंका चोप्रा देणार लाइव परफॉर्मन्स

प्रियंका चोप्राला गायला आवडते हे सर्वाना माहीत झाले आहे.तिची ही आवड लक्षात घेऊन दिग्दर्शक अनुराग बसू यांनी बर्फी या चित्रपटासाठी गाणे सादर करावे असा आग्रह प्रियंका कडे धरला होता. मात्र आनंदाची बाब अशी की प्रियंका गाणे म्हणणार आहेच पण रणबीर कपूर सोबत लाइव परफॉर्मही करणार आहे.

अनुरागने प्रियंकाची भेट घेतली होती तेव्हाच प्रियांकाने प्रेक्षकांपुढे लाइव परफॉरमन्स द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर विचार करण्याबाबत प्रियंकाने काही वेळ मागून घेतला होता. तशीच विनती अनुरागने रणबीरला सुद्धा केली होती. अनुरागच्या इच्छेनुसार रणबीर व प्रियंका दोघेही आता लाइव परफॉर्म करण्यासाठी तयार झाले आहेत.

या दोघासोबत म्युझिक कम्पोझर प्रीतम सुद्धा लाइव परफॉर्मन्स सादर करण्यासाठी स्टेजवर असणार आहे. हा लाइव परफॉर्मन्स ऑगस्ट महिन्याच्या एन्डला काही ठराविक शहरातून केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत अनुरागने मात्र अजून कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

Leave a Comment