राणीने केलाय वर्षभरापूर्वीच आदित्यशी विवाह

आपल्या चाहत्यांना आणि अख्ख्या बॉलीवूडला चकमा देऊन राणी वर्षभरापूर्वीच चतुर्भुज झाली आहे. म्हणजे वर्षभरापूर्वीच आदित्य चोप्राच्या नावाची मेहंदी तिने हातावर लावली आहे. अजून समजले नाही ? अहो राणीने आदित्याशी वर्षापूर्वीच लग्न केले असल्याची बातमी आमच्या खात्रीलायक सूत्राने दिली आहे.

बऱ्याच दिवसापासून राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांच्या अफेयरच्या बातम्या येत होत्या. मात्र दोघेही आम्ही नाही त्यातले असेच सांगत होते. मात्र यशराज बॅनरच्या सुत्रानुसार राणी व आदित्यनी गेल्या वर्षी दिवाळीतच विवाह केला आहे. मात्र ही बातमी बाहेर फुटू नये यासाठी दोघेही काळजी घेत आहेत.

आमचे सूत्र असेही सांगते की यशराज बॅनरमधील प्रत्येक जन राणीला भाभी म्हणून बोलवितो. राणी व आदित्यने नुकताच तिचा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. मात्र या पार्टीला फक्त शाहरुख खान व कतरीना कैफ दोघेच उपस्थित होते. काही दिवसापूर्वीचच आदित्यने राणीला अडीच कोटी रुपयाची ऑडी गिफ्ट दिली आहे. म्हणजे काय जास्त सांगणे न लगे.

Leave a Comment