आण्ड्रोइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यास सोपी आहे. तिचे डेव्हलपर्स जगभर पसरलेले आहेत, जे तिच्यासाठी अॅप्स (अॅप्लिकेशन्स) तयार करतात. मात्र, अॅपल ऑपरेटिंग सिस्टिमचे डेव्हलपर्स कमी आहेत. त्यामुळे तिचे अॅप्स डेव्हलप करणे सोपे नाही. याशिवाय अॅपलमध्ये नसलेले अॅप्स आण्ड्रोइडमध्ये उपलब्ध आहेत.
नेव्हिगेशन आहे सोपे
आण्ड्रोइडमध्ये नेव्हिगेशन सिस्टिम सोपी आहे. त्यामुळे मेल ब्राउझ करणे, मेसेज पाठवणे, कॉल करणे, व्हिडिओ पाहणे, इतरांना मेसेज फॉरवर्ड करणे आणि फाइल अॅटॅच करणे सोपे जाते. आण्ड्रोइड स्मार्टफोनमध्ये या सर्व गोष्टी एका क्लिकसरशी होतात.
गुगल सव्र्हिस सपोर्ट
आण्ड्रोइड सिस्टिम गुगलच्या साह्याने डेव्हलप करण्यात आली आहे. त्यामुळेच गुगल सर्च व जी-मेल वापरणारे लोक आण्ड्रोइडला अधिक पसंती देतात. आण्ड्रोइडवर थेट सर्च करण्याची सुविधा असताना आधी गुगल ब्राउझ आणि नंतर सर्चसाठी टेक्स्ट टाइप करण्याएवढा वेळ कुणीच दवडू इच्छिणार नाही.
त्याच्या साह्याने तुम्ही सहजतेने सोशल साइटसवर जाऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, आण्ड्रोइडच्या माध्यमातून तुम्ही फेसबुक व टिवटरसारख्या सोशल साइटसवर आयओएसपेक्षा लवकर जाऊ शकता.
स्मार्टफोनसाठी मोफत
आण्ड्रोइडचे कोणतेही सॉफ्टवेअर तुम्ही मोफत वापरू शकता. मात्र, आयओएस मोफत उपलब्ध नाही. तथापि, अॅपलचे बरेच अॅप्लिकेशन्स वेगळे व महागडेही आहेत. याउलट बहुतेक आण्ड्रोइड अॅप तुम्ही मोफत वापरू शकता. तसेच आण्ड्रोइड उपकरण कमी किमतीत उपलब्ध होते, तर आयओएस खूप महाग आहे. आण्ड्रोइड फोन तुम्हाला १०० डॉलर्सला (जवळपास ५६०० रुपये) मिळेल, तर आयओएससाठी तुम्हाला कमीत कमी ४०० डॉलर्स (जवळपास २२,४०० रुपये) मोजावे लागतील. किमतीतील एवढ्या तफावतीमुळेच आण्ड्रोइडला बाजारावर वर्चस्व मिळवणे सोपे गेले.
उत्तम कनेक्टिव्हिटी
आण्ड्रोइड उपकरणात आयओएसपेक्षा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा चांगली आहे. त्याबरोबरच आण्ड्रोइड उपकरणात नेटवर्कही सोपे असते. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी लोक आण्ड्रोइड उपकरणाचा जास्त वापर करतात. जाणकारांच्या मते आण्ड्रोइड हेच स्मार्टफोनचे भविष्य आहे.