सैफशी विवाह करण्यावर करीनाचे विचार बदलले!

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री करीना कपूरची खूप दिवसांपासून प्रतीक्षित विवाह करण्यावर अजुन काही निश्‍चित दिसत नाही. प्रत्येक लोकांच्या डोक्यात हा प्रश्‍न निर्माण होत आहे की, सैफ -करीना विवाह करतील की नाही? जर विवाह करतील तर तो केव्हा होईल. उल्लेखनीय आहे की, सैफची आई व अभिनेत्री शर्मिला टॅगोरने विवाहाचा दिनांक यावर्षी १६ ऑक्टोबरला होण्याची पुष्टी केली होती. परंतु याच्या काही दिवसानंतरच हे वृत्त आले की, करीना कपूरच्या मनात विवाह दिनांकावर आणखी काही विचार आहेत. तसेच अपुष्ट सूत्रानुसार, तिने म्हटले होते की, ती विवाहासाठी तयार आहे.

बेबोचा एक मोठा चित्रपट ‘हीरोईन‘ सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी प्रस्तावित आहे आणि तिने आणखी काही मोठे चित्रपट देखील साइन केले आहेत. दिग्दर्शकांचे करीनासोबत काम करण्यात विशेष रूची दाखवूनही करीना शक्यतो या बाबीवर चिंतित आहे की, संजय लीला भंसालीने तिला आपला चित्रपट ‘रामलीला‘ ने बाहेर केले, कारण भंसालीची इच्छा एखाद्या विवाहित अभिनेत्रीला या चित्रपटात ज्युलियटच्या भूमिकेत पाहण्याची नाही.

एक टॅब्लायड वृत्तपत्राशी चर्चा करण्यात शर्मिला टॅगोर यांनी म्हटले की, प्रस्तावित दिनांकानुसार हा विवाह होणार नाही. तसेच अभिनेत्रीने याविषयी जास्त खुलासा केला नाही. त्यांचा मुलगा सैफनेही आपल्या आईला अनुरोध केला की, करीनाशी विवाह दिनांक निश्चित होईपर्यंत तिने काहीही बोलू नये.

याबाबत खुलासा केला की, विवाह तर वास्तवात १६ ऑक्टोबरला प्रस्तावित होता आणि यासाठी तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. शर्मिला व बेबो जेव्हा मागच्या महिन्यात कुटुंबासोबत लंडनमध्ये होते, तेव्हा त्यांनी विवाहसाठी खरेदी देखील केली. विवाहाचे स्थळ व पाहुण्यांच्या यादीला अंतिम रूप देखील देण्यात आले परंतु करीनाच्या मनात आता दुसरा विचार येत आहे.

शर्मिलाने सैफ-करीनाला यावर्षी विवाह करण्यासाठी अल्टीमेटम दिले आहे. त्यांनी विवाह करण्यावर या दोघांवर अंतिम निर्णय सोडला आहे.

Leave a Comment