बिपाशा वाद मिटवण्यात व्यस्त

वाद आणि भांडणे यातून काहीच निष्पन्न होत नाही हे बिप्स म्हणजे बिपाशा बसूला पटले असावे. काही दिवसापूर्वी तिचा अभिनेता सलमान खान व शहीद कपूर सोबत वाद झाला होता. मात्र बॉलीवूडमध्ये जर टिकून राहायचे असेल तर सलमान सोबत पंगा घेऊन चालणार हे तिच्या खूप उशिरा का होइना लक्षात आले. त्यामुळेच तिने सलमान सोबत डिनर घेत जुना वाद मिटवला असल्याचे समजते.

सलमान व बिपाशाने बांद्रा येथील एका हॉटेलमध्ये जेवण घेतले. यावेळी दोघेही एकमेकांशी जुन्या मित्रासारखे बोलत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. बिपाशा व जॉन यांच्यात ब्रेकअप झाल्यानंतर सलमान व बिपाशा यांच्यात मैत्री झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हाच फॉर्म्युला बिपाशाने शाहीद कपूर बरोबरही वापरला. तिने शाहीद सोबतही डिनर घेतले. मध्यरात्री २.३० पर्यंत दोघे गप्पा मारत होते असे समजते.

सध्या बिपाशा बरीचशी रिकामी आहे. फारसे चित्रपट नसल्याने जुने मतभेद विसरून काही काम मिळते का याची चाचपणी या निम्मिताने ती करीत आहे. त्यामुळेच ती सध्या अभिनेत्यांना भेटून संबध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असावी असे वाटते.

Leave a Comment