हिरोइन चित्रपटाचे पोस्टर झळकले

प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पहात आहेत त्या मधुर भांडारकरच्या हिरोइन या चित्रपटाची दोन पोस्टर झळकली आहेत. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही पोस्टर पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटाबाबतचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या पोस्टर मध्ये करीना पहुडलेल्या अवस्थेत दिसते आहे तर दुसऱ्या पोस्टरमध्ये हलकट जवानी या गाण्यावरील नृत्याच्या पोझ मध्ये आहे. ही पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच इंटरनेटवर झळकू लागली आहेत. अतिशय बोल्ड अशी ही पोस्टर प्रेक्षकांना किती आकर्षित करतात हेच पाहायचे. या चित्रपटात प्रथम ऐश्वर्या रॉय प्रमुख भूमिका करणार होती. मात्र तिने प्रेग्नंट असल्याच्या कारणावरून हा चित्रपट सोडला होता. त्यानंतर मधुरने करीनाची निवड केली.

असे सागितले जाते आहे की मधुरने हिरोईन चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले तेंव्हा पहिल्यांदा त्यांनी करीनाकडे विचारणा केली होती. मात्र करीनाने या चित्रपटात काही हॉट सीन असल्याच्या कारणावरून नकार दर्शविला होता. करीनाचे पोस्टर मात्र हा चित्रपट हॉट असणार असे संकेत देत आहे.

२१ सप्टेंबर रोजी रिलीज होत असलेल्या हिरोइन या चित्रपटाचे तीन वेगवेगळे प्रोमो तयार करण्यात आले आहेत. ए दर्जाचा प्रोमो केवळ ऑनलाइन प्रेक्षपणसाठी असेल तर दुसरा यूए प्रोमो टीवी व चित्रपटगृहासाठी असेल. तिसरा युके हा प्रोमो १२ वर्षाखालील मुलासाठी असेल असे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment