
शिस्तीचे फायदे सगळ्यांनाच माहिती असतात पण शिस्त पाळायची कोणी हीच मुख्य अडचण बरेचजणांना जाणवत असते. आपला सल्लू भाईही त्याला अपवाद नाही. विश्वास बसणार नाही पण बरेच दिवसांनंतर यशाची खरी चव चाखणार्या सलमानला शिस्तीचे महत्त्व फारच पटले आहे. विशेष म्हणजे हे महत्त्व नुसते पटलेले नसून गेले पाच महिने तो तसा वागतोही आहे. प्रकृतीची काळजी म्हणा किवा अन्य कांही पण गेल्या पाच महिन्यांपासून सलमान दारू, सिगरेटपासून दूर राहिला असून तो आता पूर्ण व्यसनमुक्त झाला आहे. वर्षापूर्वी त्याला नर्व्ह विकार झाला होता त्यातून तो बरा होतो आहे. डॉक्टरांनीही त्याला व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे आणि सलमानने तो मानला आहे.
