नवी दिल्ली, दि. २४ – देशातील वाढते दहशतवादी हल्ले व व्हीआयपी लोकांना मिळणार्या धमक्यांमुळे सुरक्षा संभाळणारी कमांडो फोर्स ’स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (एसपीजी) ने प्रंतप्रधान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांसारख्या व्हीआयपी नेत्यांसाठी स्पेशल गाडयांची मागणी केली आहे. एसपीजीचे म्हणणे आहे की, २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीआधी या गाड्या एसपीजीच्या ताफ्यात हव्या आहेत.
व्हीआयपी नेत्यांसाठी एसपीजी ५१ कोटींच्या गाड्यांची मागणी
वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एसपीजीने दहा डिफेन्स शेरपा-२ काऊंटर असॉल्ट आणि सहा डिफेन्स शेरपा-२ क्विक रिअक्शन गाड्याची मंजुरी मागितली आहे. या गाड्याची किंमत सुमारे ५१ कोटी रुपये आहे.
तर दुसर्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, एसपीजी आपल्याच लोकांमधून एक नवीन विशेष टीम बनवित आहे. याचे नाव स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) असे असेल. यात पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या परिवारांतील (व्हीआयपी) सदस्यांना त्यांच्याद्वारे सुरक्षा पुरवली जाईल. ही टीम या व्हीआयपी लोकांवर बारकाईने लक्ष ठेवेल तसेच कोणी हल्ला केल्यास त्यांच्यावर आक्रमण करेल. एसपीजी आतापर्यंत केवळ सुरक्षा पुरवित होती. आता मात्र एसपीजीचे जवान हल्ल्यावेळी शत्रूंचा नायनाट करतील.
`शेरपा-२’ ही एक हलकी व सशस्त्रबंद गाडी आहे. या गाडीला पोलिस आणि सैनिकांची गरज लक्षात घेऊन बनविली गेली आहे. ही गाडी प्रति तास १६० किलोमीटर वेगाने धावू शकते. या गाडीचे टायर बुलेटफ्रुफ, तसेच ही गाडी भुसुरुंगाना व दारुगोळ्यांना बळी न पडता सुरक्षित राहते.
`शेरपा-३’ मध्ये बॅलेस्टिक, माइन आणि आपत्पकालीन डिवाइस कीट बसविण्यात आले आहे, जे शत्रूचे काम कधीही तमाम करु शकते. `शेरपा-२’ मध्ये पाच लोक बसू शकतात. ही गाडी खरेदी करण्यासाठी एसपीजीला कॅबिनेट सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या समितीची मंजुरीची आवश्यकता असते.
एसपीजीच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवादी संघटना व्हीआयपी नेत्यांवर हल्ला करू शकतात. याशिवाय आयईईडी यांसारख्या विस्फोटकाच्या मदतीने हल्ला करू शकतात. एका अधिकार्याने सांगितले की, आम्ही २०१४ च्या निवडणूकीपूर्वी आमचा ताफा सुसज्ज असला पाहिजे.
आधुनिक हत्यारे- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसपीजी व नवीन तयार करण्यात येत असलेल्या टीममधील जवानांना अत्याधुनिक पिस्तोल, ग्लोक आणि सर्व मशीनगन देण्यात आल्या आहेत. याशिवाय हल्लेखोरांवर हल्ला करण्यासाठी सैनिकी गाड्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक आधुनिक हत्यारे, दारुगोळा एसपीजीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सरकारने एसपीजीला या चालू आर्थिक वर्षात विशेष फोर्स तयार करण्यासाठी २.६० कोटी रुपये दिले आहेत. आधुनिक शस्त्रास्त्र खरेदीसाठी १९.८६ कोटी, मोटर व्हेयिकलसाठी ७.७१ कोटी तसेच इतर साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी ७४.७० कोटी रुपये दिले आहेत. तसेच काही विशेष प्रकारचा दारुगोळा खरेदीसाठी एसपीजीला १९.८० कोटी रुपये दिले आहेत.
