
गजनी फेम असिनची ओळख सध्या विनोदी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री म्हणून झाली आहे. रेडी, हाउसफुल २ आणि बोल बच्चन या चित्रपटात तिने विनोदी भूमिका केली आहे. मात्र तिने आता विनोदी अभिनेत्रीच्या भूमिकेतून बाहेर पडण्याचे ठरविले आहे. वेगळ्या धाटणीच्या भूमिका ती यापुढे स्वीकारणार आहे.
