उद्धव ठाकरे यांची रुग्णालयातून घरी रवानगी

मुंबई: शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. जलील परकार यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या हृदयावर शुक्रवारी लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर विश्रांती आवश्यक असल्याने तज्ञांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात राहिले. या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राजकीय, उद्योग खेत्रातील व्यक्ती आणि कलाकार साहित्यिकांनी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Leave a Comment