नवी दिल्ली, दि. २१ – सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) चे १०.८२ टक्के समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी तिजोरीत चार हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या अर्थविषयक मंत्रीपरिषदेच्या समितीने हा निर्णय घेतला. अलीकडच्या काळात देशातील सर्वात मोठी स्टील उत्पादन करणार्या कंपनीत ८५.८२ टक्के समभागावर सरकारचे नियंत्रण राहिले आहे.
शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अधिकृत निवेदनानुसार या गुंतवणुकीनंतर कंपनीत सरकारची भागीदारी ७५ टक्के राहील. सरकार कंपनीत आपले समभाग भारतीय प्रतिभूति विनिमय बोर्ड (सेबी)च्या नियम आणि कायद्यानुसार विकेल.
मुंबई शेअरात सेलच्या शेअरचे मूल्य शुक्रवारी ०.८० टक्क्यांनी वाढून ९४.०५ रुपया झाले. सार्वजनिक क्षेत्रातील या महारत्न कंपनीच्या या शेअरचे मूल्य ३१ मार्च, २०१२ रोजी ४,१३०.५३ कोटी रुपये होते.