
भारतीय संघ नव्या जोमाने या मोसमातील पहिल्याच मालिकेसाठी उतरला आहे. श्रीलंकेला त्यांच्याच मायभूमीतील मालिकेत चारी मुंड्या चित करून जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थान पटकाविण्याची संधी भारतापुढे चालून आली आहे. त्यासोबतच उपकर्णधार विराट कोहलीला ही फलंदाजीतील जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थान पटकाविण्याची संधी मिळणार आहे. सध्या तो क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
