आमीर व्हिलन आणि मी हिरो – अभिषेक बच्चन

बोल बच्चन चित्रपट यशस्वी झाल्याने बॉलीवूडमध्ये सध्या अभिषेक बच्चनचा भाव चांगलाच वधारला आहे. या चित्रपटामुळे त्याचे मनोबलही  उंचावले आहे.  आगामी काळात प्रेक्षकांना आवडतील अशा भूमिका करण्याची त्याची इच्छा आहे. येत्या काही दिवसातच त्याचा धूम ३ हा चित्रपट प्रकाशित होत आहे.

धूम ३ या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना अभिषेक म्हणाला की,  तो फिजिकल ट्रेनिंग घेत असून फक्त  मसल्स बनविण्यावर लक्ष केंद्रित केलेले नाही. या भूमिकेसाठी त्यासाठी बॉडी तयार करणे आवश्यक आहे. या चित्रपटात अमीर खानचीही भूमिका आहे. मात्र अभिषेक  या चित्रपटात हिरो आहे आणि आमीर खान व्हिलन आहे. दोघांना मारामारीही करावीच लागणार आहे.

अभिषेक अमीर खान सोबत पहिल्यांदाच काम करीत आहे. त्यामुळे तो  उत्साहित आहे. आमिरकडून मला खूप काही शिकायला मिळेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. सध्या अभिषेक वेगवेगळ्या  तीन स्क्रिप्टवर काम करीत असून लवकरच हे काम पूर्ण करण्याची तयारीत व्यस्त असल्याचे त्याने स्पष्ट केले.

Leave a Comment