
बंगलोर दि.१८- जागतिक कीर्तिच्या हिरो मोटोकॉर्प या दुचाकी वाहन उत्पादक कंपनीने त्यांची नवी इग्नेटर ही स्पोर्टी मोटरसायकल मंगळवारी बाजारात लाँच केली असून तिची किंमत ५६ हजार ७४७ रूपये ठरविण्यात आली आहे.( एक्स शो रूम बंगलोर). कंपनीने त्यांची ही नवी बाईक दोन व्हेरिएंटमध्ये आणली असून बेस व्हेरिएंटला फ्रंट ड्रम ब्रेक आहेत तर टॉप व्हेरिएंटमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
