सलमानच्या तब्येतीची कैटरीनाला चिंता

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कैटरीना कैफ  एकमेकापासून वेगळे झाले आहेत अशी चर्चा असेलही .पण सत्य मात्र वेगळेच आहे सलमान व कैटरीनाला  सदैव एकमेकाची चिंता लागलेली असते. काही दिवसापूर्वी सलमानच्या हातून मार खाल्यानंतर ही कैटरीनाने त्याबाबत कुठे ब्र शब्दही काढला नाही. एवढेच नव्हे तर कैटरीना सारखीच सलमानच्या तब्येतीवरून चिंतीत असते त्यामुळेच ती सध्या जास्तीत जास्त वेळ सलमान सोबत घालविण्याचा प्रयत्न करीत आहे.

गेल्या काही दिवसापासून सलमानचा नर्व्ह डीसऑर्डरचा प्रॉब्लेम पुन्हा नव्याने सुरु झाला आहे. डॉक्टरांनी त्याला पुन्हा सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच कैटरीना सध्या तिचा चित्रपटाचे शेड्यूल सर्जरीच्या वेळी जास्तीत जास्त वेळ सलमान सोबत घालवता येईल अशा पद्धतीने प्लान करीत आहे 

सध्या सलमान दबंग २ च्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या परीस्थितीत तो सर्जरी करण्यसाठी बिलकुल राजी नाही. मात्र डॉक्टरच्या मते कुठ्लाही प्रोब्लेम येऊ न देता कामावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर  सर्जरी करावी लागणार आहे. डॉक्टरांनी सध्या त्याला काही हार्ड सीन न करण्याचा सल्ला दिला आहे. तो सर्जरीबाबत फक्त कैटरीनाचाच सल्ला ऐकेल असे सर्वाना वाटते.