काळा पैसा आणला तर राहुल पंतप्रधान

बंगळुरू, दि. १९ –  योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले की, जर कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधीने विदेशात जमा असलेला काळा पैसा मायदेशी परत आणला व भ्रष्टाचार मिटवण्याची मागणी पूर्ण केली, तर लोक त्याला स्थायी पंतप्रधान बनताना पाहू इच्छितात.

रामदेव यांनी कॉंग्रेसमध्ये गांधी यांच्या भूमिकेवर येथे पत्रकारांना सांगितले, `जर राहुल गांधीने विदेशात जमा असलेला काळा पैसा मायदेशी आणला व भ्रष्टाचार समाप्त करणे, भ्रष्ट व्यवस्था बदलली, तर कोट्यावधी लोक त्यांना स्थायी पंतप्रधान बनताना पाहु इच्छितात.’ लोकांना असा पंतप्रधान हवा जो काळा पैसा परत आणेल आणि भ्रष्टाचार समाप्त करू शकेल आणि जर राहुल गांधी या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी राहिले, तर सरकार व भ्रष्ट शासनाविरूद्ध उभे असलेल्या जनतेत संघर्ष होईल.

रामदेव म्हणाले की, देश चालवण्यासाठी चांगल्या चरित्राची गरज आहे. जर सरकार या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी राहिली तर लोकांना त्याचा सामाजिक व राजकीय रूपाने बहिष्कार करण्यास सांगितेल जाईल.

रामदेव म्हणाले, `आम्ही लोकांना म्हणू की, एखाद्या शहरात सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांना येण्याची परवानगी दिली जाऊ नये. त्यांच्या कार्यक्रमात समाविष्ट न होण्यास सांगु. कोणीही त्यांना मत देणार नाही आणि असे अवश्य होईल. आम्ही ग्राम व तहसील समिती बनवली आहे, जी हे काम करेल आणि हे नऊ ऑगस्टपासून सुरू होईल.’ एक प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, ते केन्द्राविरूद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसोबत मिळून आपल्या अंतिम श्वासापर्यंत संघर्ष करतील.

Leave a Comment