परचिनार दि.१८- रस्त्याकडेच्या एका बॉम्बचा स्फोट झाल्याने मिनीबसमधून जाणारे १२ प्रवासी जागेवरच ठार झाल्याची घटना पाकिस्तानच्या नॉर्थ वेस्ट भागात घडली असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. मृतांत बहुसंख्य अल्पसंख्याक शिट्टे मुस्लीमांचा समावेश आहे असे समजते.
बॉम्बस्फोटात पाकमध्ये १२ शित्ते मुस्लीम ठार
ही बस ओर्काझाई या आदिवासी विभागातील स्पाई गावातून निघाली होती. हे गांव शिट्टे मुस्लीम वसाहतीचे गांव आहे. हे लोक कोहाटला जाण्यासाठी बसमध्ये बसले होते तेव्हा बुधवारीच रस्त्याकडेला असलेल्या बॉम्बचा स्फोट झाला असे जमील खान या अधिकार्यांनी सांगितले.
पाकिस्तानात बहुसंख्य मुस्लीम हे सुन्नी मुस्लीम असून सुन्नी आणि शिट्टे मुस्लीमांतील चकमकी येथे नव्या नाहीत. या चकमकींचा इतिहास फार जुना आहे. आजकाल तर या चकमकी अगदी नित्याच्या झाल्या असल्याचेही हे अधिकारी म्हणाले.
इस्लामचा प्रेषित मुहम्मद हा सुन्नी पंथीय होता की शिट्टे पंथीय याचा वाद ७ व्या शतकापासून सुरू असून त्यातूनच एकमेकांचा द्वेष करण्याच्या प्रवृत्तीतून असे हल्ले होतात असेही सांगण्यात आले.
