भारत-पाकिस्तान मालिका ऍशेसपेक्षा मोठी – आफ्रिदी

कराची, दि. १८  – पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याच्या मते, भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यात खेळल्या जाणार्‍या ऍशेस मालिकेपेक्षाही मोठी आहे.

पाकिस्तानी खेळाडूंनी डिसेंबर-जानेवारीत भारतात तीन वन डे आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्याचे स्वागत केले आहे. बीसीसीआयच्या कार्यकारी समितीने दोन्ही देशांदरम्यान मालिका खेळण्यास सोमवारीच परवानगी दिली आहे.

`द नेशन’ ने आफ्रिदीच्या हवाल्याने म्हटले की,  पाकिस्तान आणि भारत यांच्यात खेळल्या जाणार्‍या मालिकेची लोकप्रियता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यात खेळल्या जाणार्‍या ऍशेसपेक्षा जास्त आहे. पाकिस्तान आणि भारत खेळले जाणारे सामन्यांबद्दल जगभरातील क्रिकेटप्रेमींना रस असतो. आम्ही भारताविरोधात खेळतो तेव्हा दबाव असतो. मात्र ते अधिक रोमांचकदेखील असते.

भारत-पाकिस्तान यांच्यातील शेवटची मालिका नोव्हेंबर, २००७ मध्ये झाली होती. त्या भारतीय संघाने ही मालिका ३-२ ने जिंकली होती. २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध संपुष्टात आणले होते.

Leave a Comment