राणी मुखर्जी थिरकणार लावणीच्या तालावर

अभिनेत्री कैटरीना कैफ व विद्या बालनने सादर केलेल्या लावणीला प्रेक्षकाचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे आता अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या आगामी काळात येत असलेल्या अईया या चित्रपटात लावणी सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभवी मर्चन्ट करीत आहे.

या चित्रपटात रानी मुखर्जीने  तीन आयटम सॉंग सादर केले असून त्यापैकी एक लावणी नृत्य आहे. या लावणी नृत्यासाठी राणीने खूप मेहनत घेतली आहे. तिचे आणि वैभवीचे चांगलेच ट्युनिंग जमले असून त्या दोघींनी  लावणी बाबतची सगळी माहिती मिळवून तिचा सेटवरच अभ्यास करून ही लावणी सादर केली आहे.

या चित्रपटची निर्मिती अनुराग कश्यप यांनी केली आहे. राणीने यात एका मराठी मुलीची भूमिका केली आहे.  तिचा नायक म्हणून दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता पृथ्वीराज काम करीत आहे. या चित्रपटाच्या शुटींगचे काम पूर्ण झाले असून आता एडिटिंगचचे काम सुरु आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक वैभवी मर्चन्ट हिने सांगितले

Leave a Comment