चायनीज कंपनीचे पाच स्मार्टफोन बाजारात

नवी दिल्ली दि.१७- जी फाईव्ह या चायनीज हँडसेट उत्पादक कंपनीने  पाच  अँडड्रोईड स्मार्टफोन मॉडेल्स भारतीय बाजारात उपलब्ध केली असून त्यांच्या किमती सात हजारांपासून ते बारा हजार रूपयांपर्यंत आहेत. जी फाईव्ह ने ए-७९, ए ८६-, आय ८८, जी ९५ व  जी डीडी  हे स्मार्टफोन बाजारात आणले असून त्यांत क्लाऊड मोबाईल इंटरनेट टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही टेक्नॉलॉजी जी क्लाऊड म्हणून ओळखली जात असून या सर्व मॉडेल्ससाठी ५.५५ जीबी लार्ज क्लाऊड स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

सर्वात प्रायमरी म्हणजे ए-७९ स्मार्टफोन हा सात हजार रूपयांना मिळणार आहे. अँडड्रोईड २.३ वर चालणार्‍या या फोनचा स्क्रीन मल्टीटच स्क्रीन असून तो ४ इंचाचा आहे. त्याला पाच मेगापिक्सलचा कॅमेराही आहे तसेच ८३२ मेगा हर्टझ चा हाय परफॉर्मर प्रोसेसर आणि थ्री जी वायरलेर इंटरनेट कनेक्शन अशी त्याची अन्य वैशिष्ठे आहेत त्याला १८५० मेअॅपची बॅटरी आणि जी सेन्सरीही बसविण्यात आले आहेत.

या मालिकेतील सर्वात महाग मॉडेलची किमत  ११,७९९ रूपये आहे. या स्मार्टफोनला ४.३ इंचाचा ग्लास फ्री टच स्क्रीन, अँडड्रोईड ४.०, आठ मेगापिक्सलचा कॅमेरा, ५१२ एमबी रॅम, १ जीएच हाय परफॉर्मन्स प्रोसेसर, बॅकअप बॅटरी, थ्रीजी वायरलेस इंटरनेट कनेक्शन, २८०० अँपिअर बॅटरी, ई कंपास आणि जी सेन्सर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

चीनी कंपनीच्या या पाच मॉडेल्समुळे स्मार्टफोन बाजारातील स्पर्धा अधिक तीव्र होईल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Comment