पाकमध्ये पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला

इस्लामाबाद, दि.१६ – वायव्य पाकिस्तानातील पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. बान्नू शहरातील हे पोलिस ठाणे असून दहशतवाद्यांसोबत अद्याप  चकमक सुरुच आहे. काही जणांना ओलिस म्हणून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या मदतीसाठी लष्कराच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.

याच शहरातील कारागृहावर एप्रिल महिन्यात तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला करून २० जहाल दहशतवाद्यांसह ४०० कैद्यांना मुक्त केले होते. अदनान रशीद या दहशतवाद्याच्या सुटकेसाठी हा हल्ला करण्यता आला होता. त्याच्यावर २००३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.