पदकासाठी दबाव नाही- सुशील कुमार

लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा सतत विचार करून मी स्वतावर कसलाच अनावश्यक दबाव आणलेला नाही, मात्र या स्पर्धेत माझे प्रदर्शन चांगले ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तुम्ही जर पदकाचा विचार करीत असाल तर तुमच्यावर दबाव येतो त्यामुळेच मी सर्वश्रेष्ठ प्रदर्शनावर भर देणार असल्याचे मत ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमार यांने एका मुलाखती प्रसंगी व्यक्त केले.

गेल्या स्पर्धेच्या तुलनेत या स्पर्धेसाठी सुशील कुमारने खूप मेहनत घेतली आहे. त्यासोबतच त्याला पूर्वीच्या तुलनेत अनुभव ही चांगला मिळाला आहे. सुशील म्हणाला की, चार वर्षापूर्वी बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक मध्ये मी कांस्य पदक मिळवले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी गेल्या स्पर्धेपेक्षा यावेळेस अधिक चांगली कामगिरी करण्याचे ठरविले आहे. कुस्तीला जागतिक स्तरावर मनाचे स्थान मिळून देण्याचा माझे  प्रयत्न असणार आहेत. मला उद्घाटनावेळी तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली त्याचा मला गर्व आहे.

स्पर्धे दरम्यान तिरंगा फडकविण्याची जबाबदारी पहिल्यादांच एका पहिलवानाला मिळाली आहे. त्यामुळे मला त्यापासून खूप काही प्रेरणा मिळाली असून आगामी काळात १०० टक्के योगदान देण्याची तयारी केली असल्याचे सुशील कुमारने स्पष्ट केले