पॅरिस,दि. १६ – फ्रान्सचा दक्षिणपंथी पक्ष नॅशनल फ्रंटने प्रसिद्ध पॉप गायिका मेडोनाच्या पॅरिस कन्सर्टदरम्यान एक छायाचित्रात नॅशनल फ्रंटच्या नेत्या मरीन ली पेन यांना स्वास्तिक चिन्हासह दाखवण्याच्या विरोधात मेडोनाविरूद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. स्वास्तिकचे चिन्ह जर्मनीचे हुकुमशाह हिटलर प्रयोगात आणत होते.
नॅशनल फ्रंटचे उपाध्यक्ष फलोरियन फिलिपोट म्हणाले की, त्यांचा पक्ष याप्रकारची घृणित तुलना कधी स्वीकार करणार नाही. मेडोनाने शनिवारी पॅरिसमध्ये झालेल्या एक कन्सर्टदरम्यान एक गीत गायिले होते. ज्याचे बोल `नोबडी नोज मी’ होते. त्या गीतादरम्यान दाखवलेल्या व्हीडिओमध्ये एक छायाचित्र होते. ज्यात मरीन ली पेनला स्वास्तिक चिन्हासह दाखवले गेले होते. त्यानंतर आणखी छायाचित्र दाखवण्यात आले होते जे जर्मनीच्या हिटलरशी खूप मिळतेजुळते होते.
फिलिपोट म्हणाले की, या आठवड्यात मेडोनाविरूद्ध खटला दाखल केला जाईल. मेडोनाचे ते व्हीडियो यापूर्वी देखील जगभरातील तीस देशात झालेल्या त्यांच्या कन्सर्टदरम्यान दाखवण्यात आले आहे. त्यावेळी देखील मरीन ली पेन यांनी इशारा दिला होता की, ते मेडोनाविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकते. फिलिपोट म्हणाले की, मेडोनाच्या विश्व भ्रमणादरम्यान ही एक भडकावणारी कारवाई आहे जेणेकरून लोकांनी त्यांच्याविषयी चर्चा करीत रहावे. फिलिपोट यांचे म्हणणे होते, `मरीन ली पेन फक्त आपलेच नव्हे तर आपले समर्थक व नॅशनल फ्रंटच्या लाखो मतदारांच्या सन्मानाची सुरक्षा करेल.’
यावर्षी फ्रान्सन्समध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मरीन ली पेन यांना १८ टक्के मत मिळाले होते. ली पेन यांनी अतिवादी तत्व व यहूदी विरोधकांना पक्षातून बाहेर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु त्यांनी अनेक प्रयत्न करूनही मागच्या महिन्यात झालेले ५७७ सदस्य असणार्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त दोनच जागा मिळाल्या. मेडोना फ्रान्सचे शहर नाइसमध्ये २१ ऑगस्टला पुन्हा एकदा कन्सर्ट करणार आहे.