
नवी दिल्ली, दि.१६ – हातांनी मैला साफ करणार्यांचे प्रश्न आणि व्यथा मांडण्यासाठी अभिनेता आमीर खानने आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी आमीरला सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला असून आमीर आणि मुकुल वासनिक यांनी आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. समाजातील सर्व नागरिकांना जगण्यासाठी समान अधिकार मिळायलाच हवा, पण देशात अशा प्रथा अजूनही देशात असल्याचे, मुकुल वासनिक यांनी म्हटले.
