मनमोहन सिंग यांची ब्रिटीश वर्तमानपत्रात नालस्ती

लंडन, दि. १६ – भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल एका ब्रिटीश वर्तमानपत्राने अतिशय संतापजनक आणि वाईट उल्लेख करुन राजशिष्टाचाराच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. ’द इंडिपेंडंट’ या वर्तमानपत्राने ’मनमोहन सिंगः इंडियाज सेव्हिअर ऑर सोनियाज पूडल’ अशा शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित केला आहे.

इंग्रजी भाषेत पूडल या शब्दाचा अर्थ कुत्र्याची एक जात असा होतो. या शीर्षकावरुन वाद सुरु झाल्यानंतर वर्तमानपत्राने वेब एडिशनमध्ये शीर्षक बदलले आणि पूडल’ हा शब्द काढून त्याऐवजी ’अंडरअचिव्हर’ शब्द वापरला आहे.

या लेखामध्ये मनमोहन सिंग यांच्या कार्यशैलीवर टीका करण्यात आली आहे. कोणतीही ठोस भूमिका न घेण्याच्या वृत्तीमुळे देशाचा विकास मंदावला आहे, असे या लेखात म्हटले आहे.

Leave a Comment