चंकी पांडेला क्या सुपर कुल है हम ची प्रतीक्षा

एकता कपूरचा बहुचर्चित  क्या सुपर कुल है हम चित्रपट  कधी रिलीज होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहेच.पण या चित्रपटाची अभिनेता चंकी पांडे  देखील वाट पाहत आहे. कारण या चित्रपटात त्याने भूमिका केली असून ही  भूमिका प्रेक्षकांना आवडेल की नाही याबाबत त्याच्या मनात वेगवेगळ्या शंका सध्या येत आहेत. त्यामुळे चंकीला ही आता प्रदर्शनाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

चंकी म्हणतो, मी शेखर सुमन सारखी परफेक्ट कॉमेडी भूमिका तर करू शकत नाही हे मला मान्य आहे. क्या सुपर कुल है हम चित्रपटात डबल मिनिंग जोक्स आहेत. अशा स्वरूपाचे विनोद मी पूर्वी कधीच केले नाहीत. या चित्रपटात मी बाबा ३ जीची भूमिका करीत आहे. यामध्ये हा बाबा नेहमी फोनवरून देवासोबत चर्चा करीत असतो.  हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मला काही काळासाठी देश सोडावा लागतो की काय अशी भीती वाटत आहे.

यापूर्वीच दिग्दर्शक एकता कपूरने चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी आणि अभिनेता रितेश देशमुख काही दिवस मुंबई सोडून बाहेर जाणार असल्याचे एका मुलाखती प्रसंगी सांगितले होते. आता चंकी देखील देश सोडण्याची भाषा करीत असल्याने या चित्रपटात असे काय दडले आहे याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.

Leave a Comment