
अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील उझबेक खासदार अहमदखान समंगण त्यांच्या मुलीच्या लग्नातच करण्यात आलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात ठार झाले असल्याचे वृत्त आहे. समंगण यांच्यासह अन्य वीस जणही या स्फोटात मृत्युमुखी पडले असून ४० जण जखमी झाले आहेत. समंगण यांच्या कन्येच्या विवाहनिमित्त सुरू असलेल्या पाटीतच पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीने अंगावर लपवून आणलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. त्यापूर्वी त्याने समंगण यांना आलिंगनही दिले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
