
नवी दिल्ली दि. १२ – काँग्रेसचे युवराज राहुल गांधीं आपले जावई व्हावेत यासाठी जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या महिलेने त्यांना १५ कोटी हुंडा देण्याची तयारी दाखवली आहे.
राहुल जावई म्हणून मिळावा, यासाठी तिने थेट वरुणराजालाच साकडे घातले आहे. नऊ जुलैपासून तिने दिल्लीतील जंतरमंतरवर भर पावसात उपोषण आणि मौनव्रत सुरू केले आहे. ’राहुल गांधी से अपनी बेटी के रिश्ते की मांग’, असा उल्लेख असलेल्या फलकाखालीच तिने ठाण मांडले आहे.
