गणितातील करिअर

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २०१२ हे वर्ष गणित वर्ष म्हणून जाहीर केले आहे. भारतामध्ये गणिताकडे दुर्लक्ष होत आहे आणि हे दुर्लक्ष असेच जारी राहिल्यास देशाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी गणित हे आपल्या करिअरचे क्षेत्र केले पाहिजे आणि तरुणांनी गणिताकडे वळले पाहिजे. हे होण्यासाठी गणिताचा विशेष अभ्यास करणारी विद्यापीठे आणि संस्था यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे.

गणितात करीअर करतील असे लक्षावधी विद्यार्थी देशात आहेत. पण त्यांना गणितात करीयर करण्याची प्रेरणा मिळणेही आवश्यक आहे. चेन्नईतली चेन्नई मॅथेमॅटिक्स इन्स्टिटयूट ही संस्था मॅथेमॅटिक्स या  एका विषयाला वाहिलेली आहे. १९८९ साली तिची स्थापना झाली आणि तिच्यात आता फिजिक्स, केमिस्ट्री याही विषयांचे उच्च शिक्षण देण्याची सोय आहे पण मॅथेमॅटिक्सच्या शिक्षणात तिने आपले खास स्थान निर्माण केले आहे. या संस्थेने केलेले आहे.

या विषयात करीअर करणारांनी आपापल्या विद्यापीठात एम.एससी. मॅथेमेटिक्स ही पदवी तर अवश्य घ्यावीच पण जमल्यास या संस्थेत प्रवेश घेऊन याच विषयात अधिक संशोधनही करावे.

गणित विषयात करीअर करायचे झाल्यास या विषयाचे काही तपशील किमान माहीत असले पाहिजेत. या विषयाचे तीन भाग केले जातात. प्युअर मॅथेमॅटिक्स, अप्लाईड मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स. गणितात करीअर करताना एकाच विषयात करावे लागते आणि पुढे त्याला काही स्कोप किंवा वाव नाही असा अनेकांचा गैरसमज असतो. असे लोक बी.एससी. झाले की एम.एससी.कडे वळतच नाहीत.

किंबहुना त्यांचा असा समज असल्यामुळे बारावीपासूनच ते गणिताला टाळायला लागतात. पण आताच्या संगणकाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या जगात अनेक आय.टी. कंपन्यांना आपल्या संशोधन आणि विकास विभागासाठी कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्सची पदवी घेतलेल्या पदवीधरांची मोठी गरज असते. एखादे वेळी कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्सची पदवी नसली तरी चालेल अन्य कोणत्याही प्रकारात ती घेतली असली तरी अशा विद्यार्थ्यांना घेऊ अशी या कंपन्यांची भूमिका असते.

गणितात ऍक्चुरियल मॅथेमॅटिक्स आणि फिनान्शीयल मॅथेमॅटिक्स याही दोन शाखा आहेत. या दोन विषयांत स्पेशलायझेशन केलेल्या विद्यार्थ्यांची विमा कंपन्यांना आणि बँकांना मोठी गरज असते. चेन्नई मॅथेकॅटिकल इन्स्टिटयूटने आता आणखी एक नवी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ती शाखा म्हणजे क्रिप्टालॉजी. या अभ्यासक्रमाचा इ कॉमर्स आणि सगळ्या प्रकारच्या ऑन लाईन व्यवसायाशी संबंध आहे.  इच्छुकांनी  [email protected] या संकेत स्थळावर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी.   

Leave a Comment