
मुंबई दि.११ – बॉलिवूड अभिनेत्री लैला खान व कुटुंबाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली लोखंडी सळई, चाकू पोलिसांना मिळाले असून ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. लैलाचा मोबाईल, गाडीची नंबर प्लेट इगतपुरीत मिळाली व उंटदरीतील फार्महाऊस परिसरात दागिने आणि स्त्रीयांची कपडे सापडले आहेत. ते लैलासह तिची आई, बहिणीचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
