आशिया खंड ‘टिवटिव’ करण्यातही पुढेच

न्यूयॉर्क, दि. १२ –  आशिया खंडाने ट्विटस पोस्ट करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. अमेरिकेतून सध्या सर्वाधिक ट्विटस पोस्ट केल्या जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतून ट्विटस पोस्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरी याच कालावधीत आशिया खंडामधून ट्विटस पोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये आशिया खंडातील ट्विटर युझरची संख्याही वाढली आहे. जगभरातून केल्या जाणार्‍या एकूण ट्विटसमध्ये अमेरिकेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २५ टक्के इतके आहे.

मात्र, मार्च महिन्यात यामध्ये ३३० टक्क्यांनी घट झाली आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर जपान आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. जपानमधून १८ टक्के, तर इंडोनेशियामधून १२ टक्के ट्विटस केले जातात. ट्विटस करण्यामध्ये भारताने आशिया खंडात चौथे स्थान पटकावले आहे.

Leave a Comment