क्रिकेट व आयुष्याप्रती माझा दृष्टीकोन बदलला : युवराज

नवी दिल्ली, दि. १३ –  क्रिकेट मैदानावर दुसरी खेळी खेळण्यासाठी तयार विश्‍वचषकाचा `मॅन ऑफ द टूर्नामेंट’ युवराज सिंह आता प्रदर्शनाविषयी जास्त विचार करत नाही. कॅन्सरची झूंज जिंकल्यानंतर या झुंझारू खेळाडूचे आयुष्य व क्रिकेटप्रती दृष्टीकोन आता बदलला आहे.

भारताला २८ वर्षानंतर विश्‍वचषक मिळवून देणारा युवराज स्वत: हा बदल स्वीकारत आहे. त्याने चर्चेत सांगितले की, आता मी हा विचार करत नाही की, क्रिकेटमध्ये माझी दुसरी खेळी कशी राहील. खेळाप्रती माझा दृष्टीकोन बदलला आहे. ज्या दिवशी मी भारताची जर्सी पुन्हा घालून मैदानावर परतेल, तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस राहील.

विश्‍वचषक २०११ चा `मॅन ऑफ द टूर्नामेंट’ राहिलेल्या युवराजने सांगितले की, मी आता आपल्या प्रदर्शनाविषयी जास्त विचार करत नाही. माझी इच्छा चांगल्या खेळण्याची आहे परंतु भविष्यात जे होईल त्याविषयी आता विचार करत नाही. काही महिन्यांपूर्वी व्हीलचेयरचा आधार घेणार्‍या या झुंजारू खेळाडूने काही दिवसांपूर्वी बंगळुरूत राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत नेटवर पुनरागमन केले. नेटवर घालवलेल्या पहिल्या दिवसावर तो खूप भावूक झाला.

युवराजने म्हटले की, कोणीही विचार केला नव्हता की, मी एकेदिवशी क्रिकेटच्या मैदानावर परतेल. ज्या दिवशी बंगळुरूत नेटवर मी पहिल्या दिवशी सराव केला, शॉट जडले, मी सांगु शकत नाही की, मला कशी जाणीव होत होती. व्हीलचेयरने मैदानावर जाणे माझ्यासाठी खुप मोठी उपलब्धी होती. चार ते सहा महिने मी अंथरूणावर राहिलो मैदानावर जाऊन मला जाणीव झाली. सहा महिन्यानंतर नेटवर परतलेल्या युवराजने सांगितले की, नेटवर सुरूवातीला त्याला भीती वाटत होती की, चेंडूने त्याला दुखापत तर होणार नाही. त्याने म्हटले की, ही भीती काढण्यात मला थोडा वेळ लागेल. नेटवरील आपल्या अनुभवाबाबत त्याने म्हटले की, पूर्वी काही दिवस पेशीत खूप त्रास होत असे. माझे शरीर अजून ५५ टक्के तयार आहे.

मी चेंडूला चांगल्याप्रमाणे मारत आहे, झेल घेत आहे व गोलंदाजीदेखील चांगली करत आहे. डोळे व हाताचा ताळमेळ चांगला असून, पायाची हालचाल अजून मंद आहे. चांगला बदल हा आला आहे की, आता मी थकत नाही. अपेक्षा आहे की, दोन महिन्यानंतर टी-२० विश्‍वचषकाद्वारे मी पुन्हा मैदानावर परंतु शकेल. भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये समाविष्ट असलेला युवराज दररोज पाच ते सहा तास सराव करत आहे. त्याचे ध्येय क्षमता पूर्वीसारखी बनवण्यावर आहे. आपल्या खेळात त्याला काय बदल जाणवत आहे याबाबत विचारल्यावर त्याने म्हटले की, अजून याबाबत काहीही सांगणे घाई होईल.

Leave a Comment