करीना सैफची जोडी प्रेक्षकांसाठी नावडती

अभिनेता  सैफ अली खान व करीना कपूर यांची जोडी जरी रियल लाइफ मध्ये एकत्रित येणार असली तरी त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना ही जोडी पडद्यावर पाहयला आवडत नसल्याचे खुद्द सैफ अली खाननेच कबूल केले आहे. करीना कपूर सोबत त्यामुळेच मी एखादा रोमेंटिक चित्रपट करायला टाळतो. प्रेक्षकाना आम्ही दोघांनी  इतरांसोबत काम केलेले पाहयला आवडते. आम्ही एकत्रित काम केलेले चित्रपट पडल्याने दोघेपण सहसा एकत्रित चित्रपट करण्यास टाळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कॉकटेल या चित्रपटात एकाच वेळी दोन तरुणीसोबत प्रेम करण्याची भूमिका कशी वाटली याबबत सैफ म्हणाला की, माझ्यासाठी या चित्रपटातील भूमिका हा वेगळा अनुभव ठरला आहे. आपण जर एकावर जीवापाड प्रेम करीत असलो तर रियल लाइफ मध्ये दुसऱ्याकडे पाहण्याची ही इच्छा होत नाही. दुसऱ्याबाबत मनात काहीच फिलिंग राहत नाही. त्यामुळेच एकामेकंवरचे प्रेम वाढते.

सध्या मुलगी साराच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलेले आहे. तिने भविष्यात काय व्हावे याबाबतचा निर्णय तिने स्वत: घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही कुणीही तिच्यावर आमचा निर्णय लादणार नाही. कुणाल खेमू हा आमच्या परिवाराचा एक हिस्सा असून त्याबाबत आमच्या परिवारात मतभेद नसल्याचेही सैफने सांगितले.

Leave a Comment