राज ठाकरे ढोंगी – छात्र संघटनेची टीका

परळी वैजनाथ दि.९ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर निव्वळ ढोंगी आहेत, अशी टीका, छात्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जावळे-पाटील यांनी सोमवारी येथे केली.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, त्यांचे मराठी भाषेचे प्रेम हे बेगडी आहे. त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत. ते महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रभावी संघर्ष करणार्‍या संघटनांपैकी छात्र संघटना ही एक आहे. यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला द्यावा अशीही त्यांनी मागणी केली.

Leave a Comment