नवी दिल्ली, दि. ८ – लोकांमध्ये नकली नोटांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) एक वेबसाइट लाँच केली आहे. वेबसाइटमध्ये नकली नोटा ओळखण्याची पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, दि. ८ – लोकांमध्ये नकली नोटांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) एक वेबसाइट लाँच केली आहे. वेबसाइटमध्ये नकली नोटा ओळखण्याची पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकने सुरु केलेल्या या संकेतस्थळावर बनावट नोटा कशा ओळखायच्या, याचे संपूर्ण तपशील दिले आहे. या संकेतस्थळाला `पेहचानो पैसे की बोली, क्योंकी पैसा बोलता है’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
www.paisaboltahai.rbi.org.in या संकेतस्थळावर १०, २०, ५०, १००, ५०० आणि १,००० रुपयांच्या ख-या नोटा ओळखण्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांना या ख-या नोटा ओळखण्याची प्रणाली डाऊनलोड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. एक डॉक्युमेंटरी फिल्मही डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आली आहे.