मोदी टोपी घालून बनले नेताजी सुभाषचंद्र बोस

अहमदाबाद, दि. ८ – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली तुलना आता नेताजी सुभाषचंद्र बोसशी केली आहे. त्यांनी एका सभेत संबोधित करताना नेताजींच्या तर्कावर एक नारा देखील दिला. त्यांनी नेताजींचा प्रसिद्ध नारा ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ याची फोडणी करून म्हटले की, ‘तुम मेरा साथ दो, मैं तुम्हें विकास दूंगा’.

अहमदाबादच्या टॅगोर हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसची इंडियन नॅशनल आर्मीच्या रेजिंग-डे सोहळ्यात मोदी नेताजी सुभाषचंद्र बोसप्रमाणे दिसणार्‍या टोपीत उपस्थित होते. सोहळ्यात रालोआकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार पीए संगमादेखील आपल्या प्रचार मोहिमेअंतर्गत येथे उपस्थित होते.

मोदी यांनी येथे सांगितले की, सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांशी लढण्यासाठी नारा दिला ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’. मी हरिपुरामध्ये नारा देऊन गुजरातच्या जनतेला `तुम मेरा साथ दो, मैं तुम्हें विकास दूंगा’ अशी मदत मागितली. स्वातंत्र्याकाळी लोक देशसाठी मरत होते परंतु आज देशातील जगणार्‍या लोकांची गरज आहे.

कार्यक्रमात मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मनमोहन सिंगवर हल्लाबोल केला. मोदी यांनी प्रश्‍न विचारला की, पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जीमध्ये ताळमेळची कमतरता होती का?

मोदी म्हणाले की, २० वर्षानंतर मनमोहन सिंग पुन्हा एकदा अर्थमंत्री बनले. मागील २४ तासात त्यांनी पाऊल उचलून आर्थिक सुधारणेसाठी धोरणाची घोषणा देखील केली. मोदी यांनी प्रश्‍न विचारला की, जेव्हा पंतप्रधान पदावर असताना तुम्ही मागील आठ वर्षात ही घोषणा केली नाही आणि जेव्हा अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला, तेव्हा तुम्ही मागील २४ तासात याची घोषणा केली? याचे काय कारण आहे.

तुमचे अर्थमंत्री तुमचे ऐकत नव्हते का? किंवा तुमचे तसेच अर्थमंत्र्यांमध्ये ताळमेळाची कमतरता होती का? मोदी म्हणाले की, या प्रश्‍नाचे उत्तर पंतप्रधान व मुखर्जी दोघांनी द्यायला हवे. ही रहस्यमय बाब आहे की, अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमोहन दुप्पट उत्साहाने आर्थिक सुधारणेच्या प्रक्रियेत व्यस्त झाले.

Leave a Comment