नवी दिल्ली, ७ जुलै-देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांनी काही उपाय सुचविले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीयांना सोन्याच्या मोहापासून दुर राहण्याचा सल्ला दिला आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी भारतीयांनी विकासाच्या विविध योजनांमध्ये पैसा गुंतवावा, असे मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे.
भारतीयांमध्ये सोन्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. सोन्यामध्ये सध्या प्रचंड उतारचढाव आहेत. परंतु, गेल्या वर्षभरात सोन्याचे भाव भरपूर वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा सोन्यात गुंतवणूक करण्यावरच आहे.
पंतप्रधानांनी मात्र याविपरित सल्ला नागरिकांना दिला आहे. ते म्हणतात, सध्या देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. सोन्यातील गुंतवणूकीमुळे बाजाराला कोणताही लाभ होत नाही. याउलट विविध क्षेत्रांमध्ये लोकांनी पैसा लावायला हवा.
ज्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाली आहे, त्यात पैसा गुंतवावा. त्यामुळे बाजारामध्ये निधीचीही उपलब्धता होईल आणि विकासालाही हातभार लागेल, असे पंतप्रधानांचे मत आहे. यंदाच्या अर्थसकल्पामध्येही सोन्यामध्ये गुंतवणूकीवरुन चिंता व्यत्त* करण्यात आली होती.