आजकाल बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी अभिनेत्रींचे खान कनेक्शन खूप उपयोगी पडत असल्याचे दिसून येत आहे. याच गोष्टीची खिल्ली उडवताना अभिनेत्री उदिता गोस्वामी म्हणाली की ती आपल्या नव्या कुत्र्याचे नाव ‘खान’ असे ठेवणार आहे.

‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’ के च्या प्रचारासाठी आलेल्या उदिताने पत्रकारांना सांगितले, ’मी माझ्या कुत्र्याला आडनावही देते. माझ्या एका कुत्र्याचे नाव मिमी गोस्वामी ठेवले आहे. तसेच माझ्या नव्या कुत्र्याचे नाव मी ‘खान’ ठेवेन. म्हणजे माझंही नाव ‘खान’ कंपनीशी जोडले जाईल. कारण हल्लीच्या सर्वच अभिनेत्री आमिर खान, सलमान खान किंवा शाहरुख खान या खान लोकांसोबत राहूनच यशस्वी झाल्या आहेत.’
उदिता २००३मध्ये ‘पाप’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आली होती. तिला सिरीयल किसर इमरान हाश्मीबद्दल विचारले असता ती म्हणाली, `इमरानच्या पडद्यावरील इमेजमुळे अभिनेत्री त्याच्यासोबत काम करायला तयार नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण, हल्ली इमरानपेक्षा या अभिनेत्रीच जास्त किसींग सीन्स देत असतात.’