एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कप नाही जिंकला : सेहवाग

मुंबई, ७ जुलै-टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आहे. मैदानावर नाही तर मैदानाबाहेर, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टार्गेट केले आहे.
’एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय मिळवला नाही, तर संपूर्ण टीम यामागे होती’, असे सेहवागने म्हटले आहे. ’धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय नाही.’ ’वर्ल्ड कपचा विजय संपूर्ण टीममुळे’ झाला आहे. त्यामुळे टीम इंडियातील या दिग्गजांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ऑस्ट*ेलिया दौर्‍यात धोनीने काही सिनियर्स खेळाडूंच्या स्लो फिल्डिंगवर ताशेरे ओढले होते. तेव्हा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला वीरेंद्र सेहवागने उत्तर दिल्याने टीम इंडियातील वाद दिसून आले होते. धोनी आणि सेहवाग यावरुन आमनेसामने आले आहेत. धोनीने सीनिअर्संना सुस्त म्हटल्यानंतर वीरेंद्र सेहवागने पलटवार करत सीनिअर्स सुस्त नसल्याचे म्हटले होते.
मी स्वतः गेल्या १० वर्षांपासून चांगली फिल्डींग करत असल्याचे सेहवागने म्हटले होते. सिनिअर्स खेळाडुंच्या स्लो फिल्डींगमुळे ज्युनिअर खेळाडूंना जास्त रन्स बनवावे लागतात असे धोनीने म्हटले होते.

Leave a Comment