श्वेताची आहे मुलीशी मैत्री

अभिनेत्री श्वेता तिवारी परवरीश या छोट्या पडद्यावरील मालिकेत जरी स्ट्रिक्ट आईची भूमिका करीत असली तरी रिअल लाईफमध्ये मात्र ती खूप प्रेमळ आई आहे. ती आपल्या मुलीसोबत मैत्रीणी सारखी वागत असल्याने त्या दोघीची आता घट्ट मैत्री झाली आहे. श्वेता तिच्या व्यस्त कामातून वेळ काढून काही वेळ तरी मुलीसोबत घालवत असल्याने त्यांच्यातील नाते अतूट असे बनले आहे.

माझी मुलगी पलक ज्यावेळी फ्री असते त्यावेळी ती सुद्धा माझ्या सोबत शूटिंगसाठी येते. शूटिंगमधून ज्यावेळी मला वेळ मिळतो त्यावेळी मी तिच्याशी सेटवरच गप्पा मारत असते. तसेच मला ज्यादिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मी तिला सोबत घेऊन शॉपिंगला जाते. आमच्या दोघीमध्ये मैत्री असल्याने ती मला खूप सपोर्ट करीत असल्याचे श्वेता सांगते.

मी जरी दररोज १२ तास काम करीत असले तरी तिच्यासाठी मी वेळ ठेवते. त्यामुळे मी तिला तक्रार करण्यासाठी काहीच कारण ठेवत नाही. परवरीश या छोट्या पडद्यावरीलवरील मालिकेत जरी मी स्ट्रीकट आईची भूमिका करीत असले तरी रिअल लाईफ मध्ये मी त्यापेक्षा किती तरी वेगळी आहे. माझ्या मुलीच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेऊन चुकत असेल तर तिला मी नेहमी प्रेमाने समजावून सांगत असते; असे श्वेता सांगते.