
सलमान खानचा राग काय असतो तो सगळ्या बॉलीवूडला माहित आहे. त्याचा फटका आतापर्यंत बऱ्याच जणांना बसला आहे. त्याच्याशी पंगा घेतलेल्या काही लोकांशी तो अजूनही बोलत नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून सलमानमध्ये बराच बदल झलेला दिसत आहे. त्याने आता बॉलीवूडमधील सर्वांशी जुळवून घ्यायचे ठरवलेले दिसत आहे. काही दिवसापूर्वीच त्याने अभिषेकशी दोस्ती केली. तर आता रणबीर कपूर सोबत असलेली दुश्मनी त्याने संपवली आहे.
