
लंडन दि. ६ – लष्करे तैयब्बाशी संबंधित असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेवर गुरूवारी मध्यरात्री पासून ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली. इंडियन मुजाहिद्दीन भारतात सतत करत असलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिक मारले जात आहेत आणि भारतात असलेल्या ब्रिटीश नागरिकांनाही या संघटनेमुळे धोका असल्याचे कारण या बंदीमागे देण्यात आले आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या संबंधी झालेल्या चर्चेत सर्व सदस्यांनी या बंदीला एकमुखाने पाठींबा दर्शविला आहे. ब्रिटनमध्ये बंदी असलेल्या ४७ संघटनांत आता इंडियन मुजाहिद्दीनची भर या बंदीमुळे पडली आहे.
