
लंडन, दि. ६- गतविजेता आणि अव्वल मानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि तिसरा मानांकित स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला. शुक्रवारी (६ जुलै) होणार्या उपांत्य फेरीत दोघे एकमेकांशी झुंजतील. फेडररने २६व्या मानांकित रशियाच्या मिखाइल यॉझ्नीचा ६-१, ६-२, ६-२ असा पराभव केला. जोकोविचने ३१व्या मानांकित जर्मनीच्या फ्लॉरियन मेयरला ६-४, ६-१, ६-४ असे सरळ तीन सेटसमध्ये नमवले.
